विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा

विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा
Pckhabar- कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेले विधिमंडळाचे कामकाज अखेर सोमवारी सुरू झाले आहे.  पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे.  सभापती रामराजे निंबाळकर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे.  उपसभापतीपदाची निवडणूक ही उद्या मंगळवारी होणार आहे.

उपसभापती निलम गोऱ्हे यांची मुदत संपली आहे. त्यामुळे हे पद रिक्त झाले. आता या पदासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. सध्याचे अंकगणित पाहता महाविकास आघाडी आणि अपक्ष या माध्यमातून आमदार संख्या जास्त असल्याने पुन्हा निलम गोऱ्हे यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *