नवमहाराष्ट्र विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

Pckhabar- शासनाच्या ‘Thanks a Teacher’ या उपक्रमाला अनुसरून नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षकांसाठी ऑफलाइन व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील , उपमुख्याध्यापक पी.एम. शेख , ज्येष्ठ शिक्षक श्री. कुलुमकर एस. बी., सांस्कृतिक विभाग प्रमुख निता शेटे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते . 
सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच covid-19 च्या कामात ज्या शिक्षकांनी कोविड योद्धा म्हणून ड्युटी केलेली आहे, त्या शिक्षकांचे विशेष सत्कार करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी हर्षल वा पटे, विवेक रासने व गणेश पांचाळ यांनी ऑनलाईन सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. एम. डी . जाधव , के.सी. नरूटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाची प्रस्तावना उपमुख्याध्यापक पी . एम. शेख यांनी केली. तर शाळा बंद व शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी ऑनलाईन विद्यालयातील सर्व विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला. श्री. मुरूमकर के.डी. यांनी सर्व उपस्थिताचे आभार मानले.










Leave a Reply