शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा: मंत्री रामदास आठवले
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करा अशी सूचना
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांच्या या सूचनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
आठवले यांनी याबाबत ट्विट करून ही सूचना केली आहे.

आठवले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.
या आधीही अशाच पद्धतीची सूचना करण्यात आली होती. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गांधी घराण्याशिवाय एखादी व्यक्ती अध्यक्षपदी यावी असंही त्यांनी म्हटलं होतं.










Leave a Reply