‘नैतिकता घालवल्याने फडणवीस अजितदादावर टीका करू शकत नाहीत’
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची फडणवीस यांच्यावर आगपाखड
Pckhabar- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू शकत नाही. कारण मुहुर्त साधत लग्न करून शपथ घेत तीन चार दिवस संसार करत ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले होते. तीन-चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत, असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आता नैतिकता घालवली गेली आहे, अशा परखड शब्दांत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस एकटेच लढत असून महाराष्ट्रभर फिरत आहे. पूर्वी आमचं टीम वर्क होतं. त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर नितीन गडकरी यांच्या ताफा चालयचा तर अलीकडे माझासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, हरिभाऊ बागडे असा आमचा एकत्र ताफा होता. त्यामुळे सरकार घाबरून गांगारून जायचं. मात्र, आता महाराष्ट्रातली सर्व नेते मंडळी शांत बसलेली आहेत. जनतेनं निवडून दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते अधून मधून बोलतात. मात्र जी आक्रमक भाषा पाहिजे, ती त्यांच्या कुठेच दिसत नाही. आम्ही कमी पडत आहोत, असं मतही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.










Leave a Reply