देहूगावकरांचा चार महिन्याचा मिळकत कर माफ करा- संतोष हगवणे (व्हिडिओ)

देहूगावकरांचा चार महिन्याचा मिळकत कर माफ करा- संतोष हगवणे (व्हिडिओ)
Pckhabar- कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून काही जणांच्या 30 ते 50 टक्के वेतन कपात झाली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहा महिन्याचा मिळकत माफ केला आहे. त्याचप्रमाणे देहूकरांचा चार महिन्याचा मिळकत कर माफ करावा, अशी मागणी विठ्ठलवाडी येथील संतोष सदाशिव हगवणे यांनी केली आहे.

याबाबत हगवणे यांनी देहूगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री कोळी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, देहू येथील बहुसंख्य मिळकत धारक हे मध्यम वर्गातील असून परिसरातील विविध कंपन्यांमध्ये कामाला जातात. शासनाने कोविड संकटामुळे दोन महिन्यांची टाळेबंदी जाहीर केल्यामुळे सर्व कंपन्या बंद होत्या. त्याचा परिणाम बऱ्याच लोकांना दोन चार महिने पगार मिळाला नाही. तसेच अनेकांची पन्नास टक्के वेतन कपात करण्यात आली होती. या परिस्थिती त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा तसेच मुलांचे शिक्षण याचा खर्च भागविणे कठीण होत आहे.

ज्या मिळकत धारकांचे व्यावसायिक मिळकती आहे अशा मिळकत धारकांना दोन तीन महिन्याचे भाडे मिळाले नाही. त्यामुळे सामान्य जनतेचा सहानुभूतीने विचार करून ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या सर्व मिळकतीच्या करामध्ये किमान चार महिन्यांची सूट द्यावी, अशी मागणी हगवणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *