नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला

नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला

Pckhabar- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झालेले कृष्णा प्रकाश यांनी शनिवारी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची एका वर्षाच्या आतच उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना अद्याप नवीन ठिकाणी पोस्टिंग दिली दिली. तर बिष्णोई  यांनी बदलीच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली आहे.

सतत हसतमुख आणि आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात तसेच शहरात पोलिसांचा वचक निर्माण करण्यास ते यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *