‘आय टी आय भविष्यातील संधी’ या विषयावरील परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar-लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडी व प्रेरणा कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आय टी आय भविष्यातील संधी’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद नुकताच आयोजित केला होता.
या परिसंवादाचे उद्घाटन पवना रिजनचे चेअरपर्सन एम जे एफ लायन सुदाम मोरे यांनी केले. अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे यांनी मार्गदर्शक नंदकिशोर जगदाळे यांचा परिचय करून दिला.
त्याचबरोबर अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
औद्योगिक तंत्रशिक्षणातील तज्ञ आणि भारतीय टेक्निकल इन्स्टिट्यूट निगडी पुणेचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जगदाळे यांनी आय टी आय स्थापनेची गरज, विविध कोर्सेस, महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय औद्योगिक तंत्रशिक्षण संस्था, तंत्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्याची प्रक्रिया, प्रवेश फी, फी परतीची सरकारी योजना, नोकरी व व्यवसायाच्या संधी या संदर्भात उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी औद्योगिक तंत्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध औद्योगिक संस्था मधील नोकरीच्या संधी विषयीच्या उपस्थित केलेल्या शंकांचे देखील निरसन केले. आय टी आयमध्ये शिक्षण घेऊन एक व्यक्ती आय टी आय संस्था उभारू शकते, हे जगदाळे सरांचे यश प्रेरणादायी आहे.
या ऑनलाईन परिसंवादात २० शाळेच्या मुख्याध्यापकांसह ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हगवणे सर मुख्याध्यापक जगदीशचंद्र हायस्कूल चिंचोली (कोकण), खर्डे सर यांनी परिसंवादासंबंधी समाधान व्यक्त केले. ही माहिती आम्हास विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन डिस्ट्रिक्ट स्कील डेव्हलपमेंटचे चेअरपर्सन एम जे एफ लायन अशोक येवले यांनी केले.
जॉईंट सेक्रेटरी लायन ऋषिकेश मुसमाडे यांनी परिसंवादाचा समारोप केला.










Leave a Reply