पिंपरीतील कन्या विद्यालयात ‘ऑनलाईन’ शिक्षक दिन साजरा
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत ऑनलाईनच्या माध्यमातून भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील उपशिक्षिका सौ फिसरेकर पी ए यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व व्यक्त केले. नंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाच्या पर्यवेक्षिका माननीय सौ पाटील यु. बी यांनी जीवनामध्ये गुरुचे असलेले अत्यंत महत्त्वाचे स्थान व सर्वगुणसंपन्न व सामर्थ्यवान पिढी घडविण्याचे काम शिक्षक आपल्या ज्ञानदानातून करत असतात असे मनोगत व्यक्त केले.

विद्यालयातील कु गायत्री काळे व कु शीतल राऊत या विद्यार्थिनींनी ऑनलाईन पध्दतीने तास घेऊन विद्यर्थिनींना मार्गदर्शन केले.
तसेच विदयार्थीनी मनोगतामध्ये कु यादव भूमिका हिने डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ , लेखक व अनेक क्षेत्रात काम करणारे सर्व सुजाण नागरिक घडविण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करत आहेत अशी माहिती दिली.
यानंतर विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ शेटे एस. एस. यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये अज्ञान रुपी अंधःकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करणारा गुरू आपल्या ज्ञान दानाच्या कार्यातून गुणवंत कीर्तिवंत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचे महत्त्व मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार सौ फिसरेकर पी ए यांनी केले.










Leave a Reply