खरच लोक कोरोनाला घाबरतात का? : वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा लेख

खरच लोक कोरोनाला घाबरतात का? : वाचा डॉ. अंकुश जाधव यांचा लेख
Pckhabar- चार लॉकडाउन पूर्ण होऊन आता चौथ्या अनलॉकला सुरवात करायला लावणाऱ्या कोरोनाच्या महासाथीने जगभर थैमान घातले आहे. जगातील प्रत्येक गोष्टीवर या महासाथीने परिणाम केला असून जग पुढे जाण्याऐवजी मागे जाऊ लागले आहे. सध्याची पिढी पाहत असलेली ही सर्वात महाभयानक साथ आहे. माणसा माणसातले संबंध संपविले. माणसातली माणुसकी या साथीने संपविली आहे. आज जगात २.५ कोटींपेक्षा अधिक लोक कोरोनाबाधित असून ८ लाख ७२ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात ३९लाखा पेक्षा अधिक लोक कोरोनाबाधित असून त्यापैकी ३० लाखापेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत तर ६८ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे. जगाचा मृत्युदर३.३आहे तर भारतात१.७६ टक्के आहे. जगात १० लाख लोकांमागे ११०लोकांचा मृत्यू होत आहे तर भारतात हेच प्रमाण ४८आहे. ब्राझील व ब्रिटन या देशात मृत्यूचे प्रमाण भारतापेक्षा  अनुक्रमे १२ व १३ पट अधिक आहे. केवळ कोरोनाच्या भीतीने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या साथीत मृत्यू दर तसा कमी आहे. तरीही लोक कोरोनाला घाबरताहेत, भीतीच्या दडपणाखाली जगताहेत हे खरे आहे. का खरे, तर लोक कोरोनापेक्षा ही त्यामुळे होणाऱ्या परिणामांना जास्त घाबरतात. ही वस्तुस्थिती आहे.

      विविध प्रकारचा मीडिया, सरकार, बातम्या सांगण्याच्या पद्धती यामुळे लोकात सुरवातीला खूपच भीती, गैरसमज निर्माण झाले होते, ते आता काही प्रमाणात कमी झाले आहेत. हे नक्की.
  लोक कोरोना घाबरण्याचे,भिण्याचे काही कारणे-
१)लॉकडाउन ची पद्धत व स्थलांतरितांचा प्रश्न
२३ मार्च पासून अचानक सुरू झालेला लॉकडाउन हा कोरोनाच्या भीतीला मुख्य कारणीभूत ठरला. त्यामुळे लोकांमध्ये कोरोना विषयी प्रचंड भीती निर्माण झाली. १४एप्रिल नंतर लॉकडाउन वाढविला गेल्याने राज्या राज्यात  काम करणारे कामगाच्या खाण्यापिण्याच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी आप आपल्या घरी जाण्यास सुरवात केली. त्यामुळे स्थलांतरीतांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. एप्रिलमध्ये विविध राज्यातून ४० लाख लोकांनी स्थलांतर केले. त्यामुळे पहिल्या लॉकडाउनमुळे जो काही लाभ झाला असता तो न होता. उलट कोरोना चा प्रसार, फैलाव व्हायलाच मदत झाली.
   
२)मीडियाचा अतिरेक
आज जगभरात सोशल मीडियाचे ३०० कोटी पेक्षा अधिक उपभोक्ता आहेत. सर्व प्रकारचा मीडियाने कोरोना विषयक बातम्यांचा अतिरेक केला. कोरोना ने घाबरलेले लोक सुरवातीला सतत बातम्या पहात असत. टी. व्ही. वाले एक जरी रूग्ण मिळाला तरी त्याची ब्रेकिंग न्युज करून अक्षरशः किंचाळून सांगत. सर्वच बातम्यामधून असे काही दाखविले जात असे की, आता सर्व काही संपणार, कोरोना आपणाला खाऊन टाकणार. थैमान, हैदोस, भयंकर, दहशत, विनाश, थरकाप इ.शब्दांचा मुक्त हस्ते वापर करून लोकांना गर्भगळीत करण्याचे काम दररोज उत्साहाने केले जात असे. वारंवार रुग्णालयातील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असणाऱ्या रुग्णांची दृश्ये दाखवून लोकांत चिंता, तणाव, भिंती  पसरवल्यांने लोक पॅनिक होत होते. एकूण कोरोनाबधितां मधून बरे झालेल्या रुग्णाचा आकडा वजा करून राहिलेल्या रुग्णाचा आकडा जाहीर करणे चांगले झाले असते. त्याने लोकांची भीती कमी झाली असती, परंतु असे आज ही केले जात नाही. आपल्याकडील विविध वाहिन्यांनी बातम्या कशा द्याव्यात, दृश्ये कशी दाखवावीत यासाठी बी.बी.सी.च्या बातम्या अवश्य पहाव्यात.

३)रुग्णालयात बेड उपलब्ध नसणे

कोरोनाबधित लोकांना या काळात सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ शकले नाहीत. रुग्णांना बेड शोधण्यासाठी व मिळण्यासाठी खूप त्रास झाला.२-२ दिवस ताटकळत राहावे लागले. याचा सर्वसामान्य लोकां वर मोठा परिणाम झाला.

४)खाजगी रुग्णालयातील भरमसाट बिले

रुग्णांना सरकारी रुग्णालयात बेड न मिळाल्याने वा ज्यांची परिस्थिती बऱ्या पैकी आहे अशांनी खाजगी रुग्णालयात भरती होणे पसंत केले. परंतु रुग्णालयानी दिलेली बिल पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली. १० लाखा पासून ३० लाखांपर्यंत बिलं आकारली गेली. आयुष्य भर कमावलेले पैसे१०/१२  दिवसात जाऊ लागले. याचा लोकांवर फार मोठा परिणाम झाला व लोकांनी कोरोनाचा धसका घेतला.

५)क्वारटाइन व्हावे लागणे
सुरवातीला याचा कालावधी १४ दिवसाचा होता. या काळात अशा सेंटर मध्ये राहणे ही दिव्य होते. याचा ही लोकांनी खूप धसका घेतला होता.

६) कोरोनाची निश्चित चिकित्सा नाही
हे थोड्याच दिवसात सर्वाना समजले. परिणामी लोकांत जास्तच भीती निर्माण झाली.

७)महागडी औषधे
सुरवातीला कोरोना वर उपयुक्त ठरली “टोसिलिझूमब “व “रेमडेसिवीर”. “टोसिलिझुमब” या इंजेवशन ची किंमत ४० हजार होती. हे उपलब्ध होत नव्हते, हे उपलब्ध होत होते काळाबाजारात ७० ते ८०हजार रुपयांना. मनमानी किंमत आकारली जात होती. आता हेच कोरोना वर उपयुक्त नसल्याचे रोश कंपनी म्हणू लागले आहे. याला काय म्हणावे? एका एका रुग्णाचा औषधांचा खर्च २ ते ५ लाख  करावा लागे/करावा लागत आहे.  निश्चित चिकित्सा नसतानाही बिल मात्र भरमसाट येऊ लागली. याची चर्चा सर्वत्र हाऊ लागली व लोक आपोआपच कोरोनाला घाबरू लागली.

  ८)समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन
सर्वच प्रकारच्या बातम्या, सांगण्याची पध्दती अशा होत्या की, कोरोना झाला म्हणजे कोणता तरी महाभयंकर आजार झाला. याच्या विषयी झालेल्या गैरसमजुती मुळॆ कोरोनाबाधीताला लोक बहिष्कार करू लागले. कोरोना वर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी यांना ही लोक कॉलनीत, हौसिंग सोसायटीमध्ये येण्यास बंदी करू लागले. बरे झालेल्या रुग्णाला टाळू लागले. अखेर सरकारला कारवाईचे आदेश द्यावे लागले.
        कोरोना मुळे निर्माण झालेल्या, होत असलेल्या या सर्व  परिणामांमुळे लोक खऱ्या अर्थाने भ्याले, घाबरले व घाबरताहेत कोरोनाला.
“कष्ट” उतना “कष्टदायक” नहीं होता है, ।
जितनी उसकी “चिंता” “कष्टदायक” होती है।
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *