नागरी सुविधा केंद्र चालकाने अर्ज भरण्यासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा; पालिकेचे आवाहन
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना पालिकेच्या विविध सेवा सुविधा विहित कालावधी मध्ये त्यांचे जवळच्या ठिकाणी उपलब्ध होतील या दृष्टीने नागरी सुविधा केंद्र कार्यरत आहेत. सदर केंद्रामध्ये नागरिकांना विविध दाखल्यांचे अर्ज स्विकृतीची सोय केली आहे. केंद्र चालकांनी अर्ज भरताना ठरवून दिल्याप्रमाणेच पैशाची आकारणी करावी. नागरी सुविधा केंद्रचालकाने जादा रक्कमेची मागणी केल्यास पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रात लेखी तक्रार करावी असे आवाहन मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार यांनी केले.
पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना पालिकेच्या विविध सेवा सुविधा विहित कालावधी मध्ये त्यांचे जवळच्या ठिकाणी उपलब्ध होतील. या दृष्टीने नागरी सुविधा केंद्र कार्यरत आहेत. केंद्रामध्ये नागरिकांना विविध दाखल्यांचे अर्ज स्विकृतीची सोय केली आहे. सद्यस्थितीत केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना तसेच केंद्रशासनाचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अर्ज सादर केलेल्या अर्जदारांचे डीमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगीक कागदपत्रांची स्विकृती नागरी सुविधा केंद्रामध्ये करण्यात येत आहे.
केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत नागरी सुविधा केंद्रामार्फत अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्याकामी जास्तीत जास्त 50 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जमा होणाऱ्या डिमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगिक कागदपत्रांसाठी नागरिकांनी 5 हजार रुपये डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणतीही ज्यादा रक्कम कोणत्याही नागरी सुविधा केंद्र चालकास देऊ नये तसेच केंद्रचालकाने नागरिकांकडून डी.डी. व्यतिरिक्त इतर कोणत्याही रक्कमेची मागणी करू नये.
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत या पुर्वी अर्ज केलेल्या नागरिकांनी डिमांड ड्राफ्ट नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावयाचा आहे. तथापि, सदर योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करित असलेले नागरीक सदर अर्ज कोणत्या ही ठिकाणी, सायबर कॅफे अथवा इतर ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. यासाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरल्यानंतर डीमांड ड्राफ्ट व त्या अनुषंगिक कागदपत्रे नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावयाचे आहेत.
पालिकेच्या च्या इतर सेवांसाठी पुर्वी प्रमाणेच प्रती अर्ज 20 रुपये नागरी सुविधा केंद्रचालकांना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सर्व नागरिकांनी नोंद घेवून कोणत्याही नागरी सुविधा केंद्रचालकाने जादा रक्कमेची मागणी केल्यास लेखी तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.










Leave a Reply