(डॉ. अंकुश जाधव)
Pckhabar-सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनामध्ये दूधाला अत्यंत महत्व आहे.दूधाला “जीवन” असे नाव आहे.कारण सर्वच प्राणिमात्रांचे पोषण जन्मल्यानंतर केवळ दुधानेच होते. सामान्यतः स्त्री, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडी, गाढवीण, उंटीण , डुकरीन, रेनडियर, देवमासा, ससा, कुत्री हत्तीण इ. या प्राण्यांपासून दूध मिळते. व्यवहारात म्हैस , गाय, शेळी यांच्याच दूधाचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. राजस्थान, हरियाणा या राज्यात उंटीण, घोडी, गाढविण या प्राण्यांच्या दुधाचा काही प्रमाणात उपयोग करतात. आयुर्वेद शास्त्रात गाय, म्हैस, शेळी, मेंढी, उंटीण व गाढविण यांच्या दुधाचे गुण, कर्म व उपयोग वर्णीत केले आहेत.
गाय, म्हैस यांच्या दुधाच्या डेअरी सर्वत्र आहेत. परंतु आता हरियाणा राज्यातील हिसार येथे भारतील पहिली “डॉंकी मिल्क डेअरी” (Donkey milk dairy) सुरू होत आहे. यासाठी हिसार येथे “राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था” ( एनआरसीई) ही संस्था स्थापन करण्यात येत आहे.
यासाठी गुजरात राज्यातून हलारी जातीच्या १० गाढविणी मागविल्या जाणार असून सध्याचा काळ हा त्यांचा प्रजनन काळ आहे. हलारी गाढविणी चे दूध हे औषधांचे भांडार मानले जाते.गाढविणी चे दूध २ हजार ते ७ हजार रुपये लिटर या दराने विकले जाते.
गाढविणी च्या दुधात पाणी-८९.९0टक्के, स्निग्ध पदार्थ-१.४०टक्के, दुग्ध शर्करा-६.१५, प्रथिने-२टक्के व लवणे-०.५० टक्के आहेत तर गायी च्या दुधात पाणी-८७.४०,स्निग्ध पदार्थ-३.७०टक्के,दुग्धशर्करा-४.७५ टक्के,प्रथिने-३.४० व लवणे-०.७० असतात.
स्निग्ध पदार्थ ज्याला आपण फॅट म्हणतो त्याचे प्रमाण गाढविणीच्या दुधात अन्य सर्व प्राण्यातील दुधा पेक्षा सर्वात कमी ( १.४०टक्के) असते.
गाढविणीच्या दुधाची शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास महत्त्वपूर्ण भूमिका आहे,असे दिसून आले आहे तसेच गाढविणी चे दूध अनेक रोगात उपयोगी आहे. कॅन्सर, स्थूलता, ऍलर्जी या सारख्या रोगात उपयोग केला जातो. गाय, म्हैस यांच्या दुधाची काही बालकांना एलर्जी होते परंतु या दुधाची होत नाही.या दुधात अँटी ऑक्सिडंट, अँटी एलर्जी तत्व प्रचुर प्रमाणात असतात
आयुर्वेद शास्त्रानुसार, गाढविणी चे दूध चवीला किंचित आंबट व खारट असते. ते शक्तीदायक व स्थिरता आणणारे आहे. याचा उपयोग वातविकार,अर्धांगवायू व दमा या आजारात करतात.दमा असणाऱ्या व्यक्तींना आज ही खेडेगावात हिचे दूध देतात.
गाढविणीच्या दुधापासून साबण, लिपबाम, बॉडी लोशन तयार करतात.
गाढविणीचे दूध










Leave a Reply