देहूगाव परिसरात एकाच दिवशी 24 नवे रुग्ण

देहूगाव परिसरात एकाच दिवशी 24 नवे रुग्ण

Pckhabar -देहूगाव परिसरात कोरोना रूग्ण संख्या कमी होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा रूग्ण संख्या वाढत आहे. गुरूवारी एकाच दिवशी 24 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 4 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 461 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 359 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

91 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये 60 रूग्णांना लक्षणे नसून 31 रुग्णांना लक्षणे आहेत. 26 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 50 रुग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *