ऐतिहासिक धम्मभुमीच्या सर्वांगीण विकासाला गती द्या- आमदार सुनिल शेळके

ऐतिहासिक धम्मभुमीच्या सर्वांगीण विकासाला गती द्या- आमदार सुनिल शेळके
Pckhabar- देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभुमीच्या सर्वांगीण विकासाला गती द्या, अशी सुचना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांना केली. 

आमदार शेळके यांनी गुरूवारी समिती, ट्रस्ट सर्व पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व समाजकल्याण विभाग यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
25 डिसेंबर 1954 साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देहुरोड येथे पहिली बुद्धमूर्ती बसवली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर याच भूमीवर विहारालगत अस्थीस्तूप तयार करण्यात आल्याने या भूमीला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. दरवर्षी या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने अनुयायी येत असतात.
“अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती दिली पाहिजे. या ऐतिहासिक भूमीचे महत्तव जपत भावी पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी भव्य ग्रंथालय, अभ्यासिका उभे राहणे गरजेचे आहे. प्रलंबित कामांना गती देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असेल. अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असुन सर्वांसोबत समन्वय ठेवुन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.”
यावेळी बोधीतत्व जनजागृती संघ, बुद्ध विहार ट्रस्ट, बुद्ध विहार कृती समिती सर्व पदाधिकारी, श्री.विशाल लोंढे विशेष अधिकारी समाजकल्याण, श्री.प्रमोद फडणीस वरिष्ठ निरीक्षक समाजकल्याण, गोपीचंद आल्हाट निरीक्षक समाजकल्याण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, मा.उपाध्यक्ष श्री.प्रविण झेंडे, श्री कुलकर्णी कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *