स्वदेशी कोवॅक्सिन’ लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरूवात
Pckhabar-कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. लस निर्मितीसाठी जगभरातील संशोधक दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. भारतातही कोरोना लसीवर वेगाने काम सुरू असून स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. आयसीएमआरने याबाबत माहिती दिली आहे.
‘कोवॅक्सिन’ लस च्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत या लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. पहिल्या टप्प्यात घेतलेल्या चाचणीत ही लस सुरक्षित असल्याचे दिसले. ‘कोवॅक्सिन’ लसीच्या चाचणीतील प्रमुख डॉ. इ. वेंकटा राव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत शरीरात आवश्यक अँटिबॉडी तयार होतात अथवा नाही यावर विशेष लक्ष देण्यात आले.
देशात सध्या स्वदेशी कोवॅक्सिन लस सह ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या ‘कोशील्ड कोविड-19’ लसीची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीने चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे.
स्वयंसेवकांना पहिला डोस देण्यात आल्यानंतर 14 दिवसांनी दुसरा डोस देण्यात आला. यादरम्यान रक्ताचे नमुने घेऊन रक्तातील अँटीबॉडीबाबत माहिती मिळवण्यात आली. डोस देण्यात आल्यानंतर 28 व्या, 42 व्या, 104 व्या आणि 194 व्या दिवशी रक्ताचे नमुने घेण्यात येतील, असेही डॉ. इ. वेंकटा राव यांनी सांगितले.










Leave a Reply