गरीब रुग्णांसाठी शरद पवार यांच्याकडून ५० रेमडेसिवीर इंजेक्शन्स अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
Pckhabar-पिंपरी-चिंचवड येथील वाढत्या कोविड रुग्णसंख्येची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट दिली. तसेच गरीब रुग्णांसाठी त्यांनी ५० रेमडेसिवीर इंजेक्शन्स अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.
यावेळी महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी वॉररुमला भेट देऊन आयुक्तांकडून सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रशासनाला विविध सुचनाही त्यांनी दिल्या.










Leave a Reply