उद्योग बुडविणार्‍यांनी उद्योग उभारण्याविषयी सल्ले देऊ नयेत : खासदार ओमराजे निंबाळकर

उद्योग बुडविणार्‍यांनी उद्योग उभारण्याविषयी सल्ले देऊ नयेत : खासदार ओमराजे निंबाळकर

Pckhabar- मुख्यमंत्री व उद्योगमंत्री सक्षम आहेत. ते जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने विविध प्रश्नासंदर्भात बैठका घेत आहेत, त्यामुळे उद्योग बुडविणार्‍यांनी उद्योग उभारणीचे सल्ले देऊ नयेत. तुमच्या आजवरच्या कारकिर्दीचा आलेख जनतेला ज्ञात आहे. तुमचा शहाजोगपणा जनतेच्या चांगलाच लक्षात आला आहे. जिल्ह्याच्या विकासांची तुम्ही चिंता करु नका व मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडु नका, अशी टीका उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर नाव न घेता केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात खासदार निंबाळकर यांनी म्हटले आहे की,
उद्योग विषयावर बैठक लावण्याची विनंती करण्याअगोदर आमदारांनी थोडी माहिती घ्यायला हवी होती. उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या उद्योगाच्या प्रश्नासंबंधी बैठक पार पडली असुन त्यामध्ये सविस्तर चर्चा देखील झाली आहे. यानंतर खास तुमच्यासाठी बैठक आयोजीत करण्याची तुमची मागणी हा निव्वळ ‘विनोद’च मानला पाहिजे.

आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री आहेत म्हणुनच तर आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी ही बैठक बोलावली. त्यामुळं जिल्ह्याकडे त्यांनी लक्ष द्यावे असला शहाजोगपणा यापुढे बंद करावा. तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करावी आमच्या नेतृत्वानी काय करावे एवढी तुमची पात्रता नाही हे सुध्दा लक्षात ठेवावे. नुसतं पत्रक काढुन व पोकळ विकासाच्या गोष्टी करुन जिल्ह्याचे चित्र बदलणार असते तर मागेच तुमच्या निवेदनाच्या पत्रावळ्या वरुन जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलुन गेला असता. या जिल्ह्यावर मागासचा शिक्का ज्यांच्यामुळं बसलाय तेच आता नव्याने विकासांच्या बाबतीत बोलतायेत यापेक्षा हास्यास्पद काय असावे.

विषयच काढला म्हणुन मी जनतेला सांगतो की, जिल्ह्याच्या विविध प्रश्नासंबंधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने व पर्यटनमंत्री यांच्या पुढाकाराने बैठका घेऊन त्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी समोर आलेल्या अडचणीची सोडवणुक करण्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रयत्न देखील सुरु केले आहेत. पण आम्हाला नुसते पत्रक काढुन गाजावाजा करायची सवय नाही. जे काय होतय ते आमच्यामुळेच असला स्वभावही आमचा नाही पण विकासांच्या बाबतीत आमचं सरकार कटिबध्द असुन योग्य दिशेन काम करत आहे असा विश्वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *