शहरात आज 1049 नवीन रुग्णांची नोंद, 809 जणांना डिस्चार्ज

शहरात आज 1049 नवीन रुग्णांची नोंद, 809 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1011 आणि पालिका हद्दीबाहेरील 38 अशा 1049 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 51 हजार 307 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 809 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 51 हजार  307 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 36 हजार 176 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 879 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 194 अशा 1073 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5507 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

शहरातील 12 आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा 15 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये काळेवाडी, भोसरी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, निगडी, दिघी, रुपीनगर, रहाटनी, चिखली, खेड, चाकण, नाना पेठ
येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *