PUBG सह ११८ ॲप्सवर भारतात बंदी
Pckhabar- केंद्र सरकारने PUBG आणि त्यासह इतर ११८ ॲप्सवर बंदी आणण्यात आली आहे.
PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work, WeChat ही बंदी घालण्यात आलेल्या ॲपची नावं आहेत. याव्यतिरिक्तही बऱ्याच चीनी ऍपवर केंद्राकडून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात बंदी घालण्यात आलेल्या ॲपची यादी देण्यात आली आहे.
‘देशाच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षिततेला, एकात्मतेला धोकादायक असणाऱ्या ११८ मोबाईल ॲपवर बंदी आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.’, असं या पत्रकात म्हटलं गेलं. या मोठ्या निर्णयामुळे आणि त्या धर्तीवर केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे देशातील मोबाईलधारक आणि मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या हिताचं संरक्षण केलं जाईल, असं निवेदन केंद्राकडून करण्यात आलं.










Leave a Reply