आपल्या भागात कोरोनाचे किती ॲक्टीव्ह रुग्ण?

आपल्या भागात कोरोनाचे किती ॲक्टीव्ह रुग्ण?

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पालिकेच्या  ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 2951, त्याखालोखाल ‘ब’ प्रभागाच्या हद्दीत 1842 सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रभाग  कोरोना हॉटस्पॉट झाले आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच 731 रुग्ण ‘ड’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

 क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 1390 सक्रिय रुग्ण आहेत. प्रभागातील रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात आली आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 1842 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 1032 रुग्ण आहेत.

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच 731 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 2951 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 1418 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 1520 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 1062 सक्रिय रुग्ण आहेत.  सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

दरम्यान, महापालिकेने मंगळवारी (दि.1) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 11 हजार 928 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 50 हजार 296 वर पोहोचली आहे. शहरात 10 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 50 हजार जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी 35 हजार 415 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  शहरातील 867 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 191 अशा 1058 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *