वायसीएममध्येही नॉन कोविड रूग्णांवर होणार उपचार
Pckhabar- सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी होण्याचा प्रशासनाचा कयास आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय इतर रुग्णांसाठी खुले करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.
पालिकेचे वायसीएम रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयामध्ये सातशे बेडची व्यवस्था आहे. याठिकाणी विविध आजारांवर उपचार केले जातात. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पालिकेकडे तेवढी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर वायसीएममध्ये उपचार सुरू केले. रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले.
रुग्णालय कोविड समर्पित केल्याने याठिकाणी येणाऱ्या शहरातील इतर आजारांच्या रुग्णांसोबतच आजूबाजूच्या रुग्णांचीही मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून पालिकेने बेडची उपलब्ध वाढविली आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून नेहरुनगर येथे जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे आता बेडची कमतरता भासणार नाही. त्यातच सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी होण्याचा प्रशासनाचा कयास आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय इतर रुग्णांसाठी खुले करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.










Leave a Reply