महाविद्यालये, हॉस्टेलमधील ‘सीसीसी’ सेंटर बंद करणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

महाविद्यालये, हॉस्टेलमधील ‘सीसीसी’ सेंटर बंद करणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

Pckhabar-महाविद्यालये कदाचित सप्टेंबर मध्ये सुरु होतील. त्यामुळे हॉस्टेलमधील कोविड केअर सेंटर (सीसीसी) बंद करुन हॉस्टेल महाविद्यालयाच्या ताब्यात द्यावे लागतील. टप्या-टप्प्याने महाविद्यालयातील ‘सीसीसी’ सेंटर बंद केले जाणार असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

 
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पालिकेने कोविड केअर सेंटरसाठी महाविद्यालयांच्या इमारती, हॉस्टेल ताब्यात घेतली होती. ताथवडेतील बालाजी लॉ कॉलेज, निगडी प्राधिकरणातील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे हॉस्टेल,  रावेत रावेतमधील डी. वाय. पाटील मुलींचे हॉस्टेल, मोशीतील आदीवासी विभाग मुलांचे व मुलींच्या हॉस्टेलमध्ये ‘सीसीसी’ सेंटर सुरु केले होते. कोरोना पॉझिटीव्ह पण काहीच लक्षणे नसलेल्या रुग्णांवर सीसीसी सेंटरमध्ये उपचार केले जात होते. किवळेतील सिम्बॉयोसिस कॉलेजमध्येही सीसीसी सेंटर केले होते. पण, ते फक्त कर्मचा-यांसाठी वापरले जात होते.

 बालेवाडी, घरकुल, म्हाडा वसाहत, म्हाळूंगे, भोसरीतील बालनगरी, ऑटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटर सुरु राहणार आहेत. त्यामुळे बेडची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *