देहूकरांनो सावध व्हा, कोरोना वाढतोय; एकाच दिवशी दोघांचा मृत्यू,18 नवे रुग्ण

देहूकरांनो सावध व्हा, कोरोना वाढतोय; एकाच दिवशी दोघांचा मृत्यू,18 नवे रुग्ण

Pckhabar -देहूगाव परिसरात कोरोना रूग्ण संख्या कमी होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा रूग्ण संख्या वाढत आहे. मंगळवारी एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला असून 18 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 8 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 426 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 348 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 67 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देहू परिसरात कोरोनाची रूग्ण संख्या वाढत आहे. नागरिकांनी ताप, सर्दीसह अन्य कोणतीही लक्षणे आढळल्यास देहूतील कोविड केअर सेंटरमध्ये जावून सकाळी 10 ते दुपारी 2  या वेळेत जावून ‘रॅपिड ॲंटिजेन’ मोफत चाचणी करून घ्यावी. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, दोन व्यक्तीमध्ये तीन ते चार फुटाचे अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *