पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रूग्ण संख्या @ 50 हजार

 

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 966 आणि पालिका हद्दीबाहेरील 19 अशा 985  नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 50 हजार पार झाली असून 50 हजार 296 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 630 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 8 आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 13 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये मोशी, भोसरी, पिंपळेगुरव, निगडी, चिखली, डुडुळगाव, सांगवी, राजगुरूनगर, आंबेगाव, खेड, रांजणगाव आणि देहूरोड येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 50 हजार  296 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 35 हजार 415 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 867 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 191 अशा 1058 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5582 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *