आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते पवना धरणातील जलपूजन

आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते पवना धरणातील जलपूजन

Pckhabar- वरुणराजाच्या कृपेने मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या, कृषीक्रांतीसाठी वरदान ठरलेल्या पवनामाईचा जलपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सौ.सारिका शेळके यांच्या हस्ते आज मंगळवारी पार पडला.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, कुसुमताई काशीकर, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, राजश्रीताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम साखर कारखाना संचालक नरेंद्र ठाकर, ज्येष्ठ नेते महादुभाऊ कालेकर, अंकुश आंबेकर, चंद्रकांत दहिभाते, संजय मोहोळ, मा.सरपंच सोमनाथ वाघोले, सागर घाडगे, मा.चेअरमन अनिल तुपे, नामदेव ठुले, माऊली निंबळे, बाळु आडकर, भीमराव मोहोळ व सर्व पदाधिकारी, सहकारी, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *