कोरोना योद्धे डॉ. लक्ष्मण गोफणे यांचा महापौरांच्या हस्ते गौरव
Pckhabar- पिंपरी-चिंचवड पालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केले आहे. त्यानिमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी डॉ. गोफणे यांचा पुस्तक, पुष्प देऊन विशेष सत्कार केला.
कोरोना रुग्णांची सेवा करत असताना नकळतपणे डॉ. गोफणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आता पुन्हा डॉ. गोफणे कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. कोरोनाला हरवून रुग्णसेवेत दाखल झाल्याने महापौर उषा ढोरे यांनी डॉ. गोफणे यांचा विशेष सत्कार केला.










Leave a Reply