America News: अमेरिकेतील अजय गंधे यांच्या घरी उत्साहात गणेशोत्सव साजरा

America News: अमेरिकेतील अजय गंधे यांच्या घरी उत्साहात गणेशोत्सव साजरा

Pckhabar- अमेरिकेतील, आयोवा एम्स येथे वास्तव्यास असलेल्या श्री. अजय गंधे आणि सौ. रुपाली गंधे यांच्या घरी मोठ्या गणेशोत्सव आणि गौरी पूजन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सातासमुद्रापार राहूनही गंधे परिवाराने ही परंपरा जपली आहे.

गंधे यांनी भारतीय परंपरेनुसार श्री गणेश आणि गौराईची प्रतिष्ठापना केली होती. गौराईला पारंपरिक पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला होता. गौराईला विविध प्रकारचे दागिने घालून नटविण्यात आले होते. आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईमध्ये बाप्पा विराजमान झाले होते.

जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकरात लवकर सर्वांची सुटका व्हावी यासाठी श्री. अजय गंधे आणि सौ. रुपाली गंधे, अक्षता गंधे यांनी बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना केली.

आम्ही अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलो तरी भारतातील गौरी-गणेशोत्सव, दिवाळी आदी सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. या सणामुळे एक वेगळाच आनंद मिळतो, असे मत श्री. अजय गंधे आणि रुपाली गंधे यांनी pckhabar. Com शी बोलताना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *