देहूगाव परिसरात एकाच दिवशी 32 जणांना डिस्चार्ज, 8 नवे रुग्ण
Pckhabar -देहूगाव परिसरात सोमवारी एकाच दिवशी 32 कोरोनाच्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 8 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 408 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 340 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
59 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये 35 रूग्णांना लक्षणे नसून 24 रुग्णांना लक्षणे आहेत. 7 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर तीर्थक्षेत्र देहूगावच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये 41 रुग्ण उपचार घेत आहेत.










Leave a Reply