उद्यापासून ई पास हद्दपार!

उद्यापासून ई पास हद्दपार!
Pckhabar- महाराष्ट्र सरकारने अनलॉक-4 ची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार उद्यापासून महाराष्ट्रातकोणत्याही भागात जाण्यासाठी ई पासची अट शासनाने रद्द केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा बाहेर जाण्यासाठी ई पासची काढणे बंधनकारक होते. मात्र, आता ई पास शिवाय जिल्ह्याबाहेर जाण्यास -येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनं राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारन ई पास रद्द केला आहे. कोरोना व्हायरच्या महासंकटात 1 जूनपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. Unlock चा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात आणखी नियम शिथिल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *