खासदार सुप्रिया सुळे यांनी वाहिली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली
Pckhabar- माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचे निधन झाले. ते कुशल राजनीतीज्ञ होते. यासोबतच विविध विषयांवरील त्यांचा दांडगा व्यासंग होता. आयुष्यातील कैक दशके सत्तेच्या वर्तुळात घालवूनही त्यांनी तिचा दर्प स्वत:ला लागू दिला नाही. राष्ट्रपतीपदाच्या काळात त्यांनी महामहिम म्हणवून घेणे टाळले, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांचा देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न ने गौरव करण्यात आला. प्रणबदांनी आयुष्यभर धर्मनिरपेक्षता व भारतीयत्वाच्या मूल्ये जपली. एका जबाबदार पालकाच्या रुपात त्यांनी आपला पक्ष Indian National Congress च्या कार्यकर्ते व नेत्यांना सदैव मार्गदर्शन केले. संकटमोचक म्हणून ते उभे राहिले.
त्यांचे जीवन कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. प्रणबदांच्या जाण्यामुळे त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी , पुत्र अभिजित व इंद्रजीत यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.










Leave a Reply