माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

माजी राष्ट्रपती  प्रणव मुखर्जी यांचे निधन
Pckhabar- माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (वय84) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले.
त्यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी twitter वरून हि माहिती दिली.

प्रणब मुखर्जी काँग्रेसचे मोठे नेते होते. देशाचे अर्थमंत्रीपदासह त्यांनी विविध मंत्रीपदे भूषविली आहेत. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांचाकडे पाहिले जात होते. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *