अंतिम वर्षाच्या परीक्षा घरातूनच ऑनलाईन- मंत्री उदय सामंत
Pckhabar- अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
रविवारी कुलगुरु समितीच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पद्धतीने परीक्षा घेता येईल याची चाचपणी करण्यात आली. यानंतर आज दुपारी सरकारकडे या समितीने अहवाल सोपविला. यावर निर्णय घेण्यात आला असून सप्टेंबरचा पूर्ण महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आला आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा सुरु होतील, असे उदय सामंत यांनी सांगितले.
या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असून घरात बसूनच परीक्षा देता येईल याची व्यवस्था करणार आहोत. यासाठी कमी मार्कांची परीक्षा होईल. 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची युजीसीला विनंती करणार आहोत. यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाची दोन -तीन दिवसात बैठक घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892










Leave a Reply