गणपती विसर्जनासाठी देहूगावचे उपसरपंच स्वप्नील कोळोखे यांच्यातर्फे खास रथाचे लोकार्पण 

गणपती विसर्जनासाठी देहूगावात खास रथाचे लोकार्पण 
Pckhabar- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन देहूगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांनी खास सजवलेले दोन रथ गणेश मूर्ती स्विकारण्यासाठी तयार केले आहेत. या रथांचे लोकार्पण आज सोमवारी करण्यात आले.

यावेळी पं. स. मा. सदस्य सुहास गोलांडे, मा.जि. प.सदस्य माऊली काळोखे, मा. सरपंच कृष्णा  परंडवाल, कांतीलाल काळोखे, सदस्य दिनेश बोडके, शिवसेना शहर प्रमुख सुनील हगवणे,  सचिन काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशी असून हे रथ देहूगावात विविध ठिकाणी जावून नागरिकांनी दिलेल्या गणेश मूर्ती स्विकारणार आहे.

दरम्यान, स्वप्नील आप्पा काळोखे यांनी कोरोना काळात कोविड रुग्णालय उभारणीसाठी योगदान, रुग्णांना झिंक, सी व्हिटॅमिन गोळ्या, नागरिकांना अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या अशी महत्वाची गरज लक्षात घेऊन मदत केली आहे. आता खास विसर्जनासाठी रथ तयार करून गर्दी टाळणे, इंद्रायणी मातेचे पावित्र्य राखणे, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशी महत्वाची भूमिका राबवताना स्वप्निल आप्पा काळोखे यांनी ‘माझे गाव माझी जबाबदारी’ पार पाडत आहेत.

आदर्श उपसरपंच म्हणून स्वप्निल कोळोखे यांना नागरिक अभिप्राय देऊन कौतुक करत आहेत.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *