पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ ला नेटकऱ्यांचे डिसलाईकने उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ ला नेटकऱ्यांचे डिसलाईकने उत्तर

Pckhabar- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रथमच नापसंत केल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतात. मात्र, पहिल्यांदाच या मन की बात कार्यक्रम नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर डिसलाइक केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याबाबत नेटकऱ्यांमध्ये संताप दिसू लागल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणी सह ‘पीएम’, ‘पीआईबी’,’नरेंद्र मोदी’ आणि ‘भारतीय जनता पार्टी’च्या युट्यूब चॅनलवर देखील या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. मात्र पहिल्यांदाच या कार्यक्रमाला लाइक पेक्षा डिसलाइक जास्त भेटल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *