पवना धरण 100 टक्के भरले, पण यापुढेही एकदिवसाआडच पाणीपुरवठा – आयुक्त श्रावण हर्डीकर

पवना धरण 100 टक्के भरले, पण यापुढेही एकदिवसाआडच पाणीपुरवठा – आयुक्त श्रावण हर्डीकर
Pckhabar-जोपर्यंत 30 ते 40 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा यापुढेही कायम राहणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवना धरण 100 टक्के भरले असले. तरी, शहरवासीयांवरील पाणी कपातीचे संकट कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला असून आजमितीला धरणात 99.14 टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे रविवार सकाळपासून 2200 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरण 100 टक्के भरल्याने आता दररोज पाणीपुरवठा होईल. नऊ महिन्यानंतर पाणी कतापतीचे संकट संपेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. पण, तूर्तास नागरिकांची निराशा झाली आहे. वाढीव पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *