New york News: सातासमुद्रापार विद्यार्थांनी जपली गणेशोत्सवाची परंपरा…!
Pckhabar-शिक्षणानिमित्त USA, New York, Binghamton येथे वास्तव्यास असणाऱ्या भारतीय विद्यार्थांनी गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या उत्साहात जपली आहे. 200 विद्यार्थांनी एकत्र येत ‘इंडियन ग्रॅज्युएट स्टूडेंट ऑर्गनायझेश’ ची स्थापना करून सर्व भारतीय सण उत्सव साजरे केले जातात.
विद्यार्थांनी भारतीय परंपरेनुसार श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा केली होती. आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईमध्ये बाप्पा विराजमान झाले होते. दरवर्षी गणेशोत्सवाला सर्व विद्यार्थी आरतीसाठी एकत्र येतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे निर्बंध आल्याने विद्यार्थी आरतीसाठी ऑनलाईन सहभागी होत होते. विद्यार्थी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. न्यूयॉर्कमध्ये गणेश मूर्ती मिळत नसल्याने त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणरायाचे 26 ऑगस्ट रोजी आरती आणि पुजा करून विसर्जन करण्यात आले.
‘इंडियन ग्रॅज्युएट स्टूडेंट ऑर्गनायझेश’ या अंतर्गत सर्व विद्यार्थी एकत्र येतात. आठ वर्षांपासून गणेशोत्सव, दिवाळी, होळी आदी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सवासाठी दरवर्षी आठ जणांची समिती तयार करण्यात येते. समितीमधील विद्यार्थी गणेशोत्सवाबाबत सर्व नियोजन करतात, अशी माहिती ओंकार रमेश पाटील यांनी न्यूयॉर्क येथून
pckhabar.Com शी बोलताना दिली.
(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892










Leave a Reply