देहूगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकास समिती स्थापन

देहूगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकास समिती स्थापन
Pckhabar- देहूगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा दि. 22 ऑगस्ट 2020 रोजी कार्यकाळ संपला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्यासाठी, विकास कामांसाठी आणि नागरिकांच्या विविध कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विकास समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिली.

या विकास समितीची पहिलीच बैठक ग्रामपंचायत दालनात शनिवारी पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देहु अध्यक्ष प्रकाश हगवणे, ज्येष्ठ नेते सुरेश खुर्पे, प्रदीप काळोखे, सोमनाथ चव्हाण, योगेश जाधव, सुनिल कडुस्कर, जयेश मोरे, किरण चव्हाण, सचिन इंगवले, विठ्ठल काळोखे, आदिनाथ काळोखे, स्वप्नील काळोखे, विजय फिरके, निलेश मोरे, विशाल काळोखे, सचिन काळोखे, सोशल मीडिया अध्यक्ष अमित घेनंद आदी उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त ग्रामसेवक कोळी यांचे विकास कंद यांनी स्वागत केले.

दरम्यान, समिती स्थापन केल्याबद्दल देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांनी कौतुक केले आहे.

देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांना आरोग्य विभागाचे वतीने निवेदन दिले.

आरोग्य समिती-
किरण चव्हाण, आदिनाथ काळोखे, आकाश काळोखे, महेश परंडवाल, प्रविण काळोखे.

शिक्षण समिती-
विकास कंद, स्वप्नील काळोखे, विजय हगवणे, खलील शेख, दिपक विधाटे.

विद्युत सनियंत्रण समिती-
जयेश मोरे, योगेश जाधव, सोमनाथ चव्हाण, राजाराम वाघ, राजेश वळसे-पाटील, स्वप्नील शिंदे.

पाणी पुरवठा आणि शेती व्यवस्थापन समिती-
प्रदीप काळोखे, निलेश मोरे, भरत काळोखे, चंद्रकांत भोसले, नवनाथ देवकर, संदीप टिळेकर.

स्वच्छता विभाग आणि कचरा व्यवस्थापन समिती-
प्रशांत काळोखे, बाळासाहेब माने, अनिल विधाटे, राजाभाऊ शिंदे, विजय मुसुडगे, फारूक मुलानी.

रस्ते विभाग आणि बांधकाम समिती-
सुनिल कडुसकर, सागर गायकवाड, अमित घेणंद, शैलेश चव्हाण, संदीप आव्हाळे यांच्या समावेश आहे.

(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *