देहूगाव परिसरात 11 नवे रूग्ण, 30 जणांना डिस्चार्ज

देहूगाव परिसरात 11 नवे रूग्ण, 30 जणांना डिस्चार्ज

Pckhabar -देहूगाव परिसरात शनिवारी कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. 30 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.

देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 393 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 308 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

76 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजअखेर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 रूग्णांना लक्षणे नसून 26 रुग्णांना लक्षणे आहेत. 9 जणांचे घरगुती विलीनीकरण करण्यात आले आहे. तर कोव्हिड केअर सेंटरमध्ये 57 रुग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *