Pimpri news शहरात कोरोनाचे 1 हजार 240 नवे रूग्ण; एकाच दिवशी 1 हजार 163 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारीवारी कोरोनाचे 1 हजार 240 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 47 हजारी ओलांडली आहे. तर शहरात आज 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 163 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 47 हजार 660 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 हजार 756 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात शनिवारअखेर 33 हजार 272 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरातील 862 तर शहराबाहेरील 182 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क घालावा, फेस शिल्डचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.










Leave a Reply