‘कोरोना काळातील सहा महिन्याच्या मिळकत कर माफ करा’
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे केंद्र सरकारने 25 मार्च पासून संपूर्ण देश लाँकडाउन केला. रूग्णांची वाढती संख्या पाहून वारंवार केंद्राने व राज्य सरकारने लाँकडाउन वाढवला. अजून ही पुर्णपणे लाँकडाउन काढलेला नाही. गेले सहा महिने नागरीक लाँकडाउनमध्ये जीवन जगत आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे गोरगरीबांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही नागरिक गावाकडे गेले आहेत. लहान-मोठ्या व्यवसायिकांवर असंघटीत कामगरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना काळातील सहा महिन्यांचा महापालिकेने मिळकत कर माफ करावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीनेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास अप्पर सचिव प्रविण परदेशी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजही अनेक आस्थापनामध्ये कामगारांची कोरोनाच्या नावाखाली पिळवणूक चालू आहे. यातच महागाईचा भडका उडाला आहे. भरमसाठ विज बीलामुळे नागरीक हैराण झाले आहेत. उद्योगनगरीत लघुउद्योग व्यावसायिक भयभीत झाले आहेत. अशा वेळी महापालिकेने कोरोना काळातील सहा महिन्यांचा मिळतकर माफ करून दिलासा, द्यावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, गजानन धाराशिकर, आळंदी सचिव रवी भेंनकी यांनी केली आहे.










Leave a Reply