‘गणपती बाप्पा मोरया…मंगल मूर्ती मोरया’च्या…जयघोषात सात दिवसाच्या गणपतीचे विसर्जन
Pckhabar- बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘बाप्पा कोरोना घेऊन जावा, सुखाचा दिवस परत यावा’, ‘गणपती बाप्पा मोरया…मंगल मूर्ती मोरया’च्या…जयघोषात शहर आणि परिसरात सात दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यंदा कोरोनामुळे नदीत, विसर्जन घाट तसेच हौदात विसर्जन न करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे बहुतांश भक्तांनी घरीच गणरायाचे शुक्रवारी विसर्जन केले.
दरवर्षी गणरायाच्या विसर्जनासाठी घाटावर भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे घाटावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली असल्याने नदीपरिसरातील विविध घाटांवर शांतता पाहण्यास मिळाला. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळे गर्दी टाळण्यासाठी अतिशय साधेपणाने उत्सव साजरा करीत आहेत.
शहरात सात दिवसांचा गणपती बसविणार्या भक्तांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन भक्तांनी घरच्या घरीच गणरायाचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. तर काही भक्तांनी परिसरात महापालिकेच्या फिरत्या हौदात लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. त्यामुळे त्या त्या परिसरातील विसर्जन घाट रिकामे होते.










Leave a Reply