उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह 11 नेत्यांना पोलिसांची नोटीस

उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह 11 नेत्यांना पोलिसांची नोटीस
Pckhabar- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी 2018 मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
अजित पवार आणि अन्य नेत्यांविरोधातील दोषारोपपत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे सरकारमधील वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *