सुनील गावस्करांनी महेंद्रसिंग धोनीबद्दल सांगितला एक किस्सा…

सुनील गावस्करांनी महेंद्रसिंग धोनीबद्दल सांगितला एक किस्सा…
Pckhabar- भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि  दिग्गज यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी नेहमी इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने घेतलेले निर्णय सर्वानाच धक्का देणारे असतात. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीबद्दल एक किस्सा सांगितला होता.

गावस्करांनी सांगितले की, देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान धोनी (MS Dhoni) बिझनेस क्लासमधून प्रवास न करता इकॉनॉमी क्लासमधुन प्रवास करत असे. धोनीला आपल्या संघ सहकाऱ्यांबरोबर बसन्यापेक्षा टी.वी. क्रू मेंबरसोबत बसण्यात आनंद मिळत होता.
खरं तर भारतीय संघात अशी व्यवस्था आहे की, चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बिझनेस क्लासमधून प्रवास करण्यासाठी मुभा असते. धोनीने कर्णधार म्हणून आपली कामगिरी अतिशय चोख पद्धतीने बजावली होती. यामुळेच तो बिझनेस क्लासमधून प्रवास करू शकत होता.  तरीही तो बिझनेस क्लासमधून प्रवास करत नव्हता. तर तो इकॉनॉमी क्लासमध्ये बसून टी.व्ही. क्रूमेंबर सोबत प्रवास करीत असे.
गावसकर याबद्दल बोलताना म्हणाले होते की, “देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दोन्हीही संघ एकाच चार्टर्ड विमानाने प्रवास करतात. यामध्ये टी.व्ही. क्रूमेंबरचा देखील समावेश असतो. अशामध्ये बिझनेस क्लासमध्ये (Business Class) मर्यादित सीट्स उपलब्ध असतात. ज्यामध्ये कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक बसतात.”
“परंतु धोनी उत्तम कर्णधार असूनही तो केव्हातरीच बिझनेस क्लासमधून प्रवास करत होता. अधिक वेळा तर तो इकॉनॉमी क्लासमध्ये (Economy Class) टी.व्ही. कव्हरेज करणाऱ्या लोकांबरोबर, कॅमेरामन किंवा साऊंड इंजिनियर यांच्याबरोबर बसत होता,” असेही गावसकर यावेळी म्हणाले होते.  यावेळेचा धोनी मनमुराद आनंद लुटत असे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *