Pimpri news शहरात कोरोनाचे 1 हजार 48 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी कोरोनाचे 1 हजार 48 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 46 हजारी ओलांडली आहे. तर शहरात आज 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 246 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 46 हजार 516 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 हजार 644 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात शुक्रवारअखेर 32 हजार 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरातील 852 तर शहराबाहेरील 178 जणांचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply