मावळातील वडगावमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना; विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून जपली सामाजिक बांधिलकी

मावळातील वडगावमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना; विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून जपली सामाजिक बांधिलकी
Pckhabar- ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचा कौतुकास्पद निर्णय वडगाव शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि ऐक्य राखण्यास मदत होईल. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय स्तुत्य आहे.
नगरपंचायत वडगाव मावळ, पोलीस स्टेशन वडगाव मावळ, मावळ ग्रामीण पत्रकार संघ व सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सवाच्या खर्चाला फाटा देत कोरोनाचा सामना करण्याकरिता विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमात ‘कोरोना प्राथमिक आरोग्य तपासणी’ करण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांनी युक्त बस आमदार सुनिल शेळके फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवत तालुक्याला एक आदर्श गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.
यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, जेष्ठ नेते, पत्रकार बंधू, पोलिस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *