Pckhabar- शहरात कोरोना बधितांच्या संख्येने २०० ची संख्या ओलांडली असून शहरात आता एकूण कोरोना बधितांची संख्या २०६ झाली आहे. मागील दोन दिवसात शहरामध्ये १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय कोरोनामुळे एका जेष्ठाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा शहरातील इराणी चाळ ‘जी’ वॉर्ड येथील ६४ वर्षीय महिला, रायवूड लाल टाकी परिसरातील एक ६८ वर्षीय महिला, सिद्धार्थ नगर ‘ई’ वॉर्ड येथील ६९ वर्षीय महिला, वर्धमान सोसायटी मधील एक ६१ वर्षीय व्यक्ती, जुना खंडाळा रेल्वे गेट येथील ४० वर्षीय व्यक्ती, रोहिदास वाडा खंडाळा येथील ५२ वर्षीय व्यक्ती, ‘एफ’ वॉर्ड लोणावळा बाजार येथील ४१ वर्षीय महिला, सह्याद्री नगर हुडको येथील ५४ वर्षीय पुरुष, वर्धमान इनक्लेव्ह सोसायटी येथील २५ वर्षीय युवक, भुशी येथील ६५ वर्षीय महिला, पांगोळी येथील ४० वर्षीय महिला, भांगरवाडी येथील २८ वर्षीय युवक, नांगरगाव येथील ६८ वर्षीय पुरुष आणि रामनगर भुशी येथील ६५ वर्षीय पुरुष अशा एकूण १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील ७ अहवाल हे कोविड केअर सेन्टर, झालावाडी येथील असून उर्वरित अहवाल हे खाजगी रुग्णालयात तसेच लॅब मधून प्राप्त झाले आहे.
आज लोणावळा शहरातील गवळीवाडा विभागातील ७९ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शहरातील कोरोना मुळे मृत झालेल्या नागरिकांची संख्या आता ८ झाली आहे. याशिवाय शहरातील आतापर्यंत १२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या ७५ इतकी आहे.










Leave a Reply