पवना धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल शंभरीकडे…
Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ लागल्याने शहरवासीयांचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. आज अखेर धरणात ८९.२९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून ५४ टक्के वाढ झाली असून २४ तासात १.३४ टक्के वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ११ मि.मि.
१ जूनपासून झालेला पाऊस = १,४०० मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = ३,१४९ मि.मि.
धरणातील सध्याचा पाणीसाठा = ८९.२९ टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = १०० टक्के
गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= १.३४ टक्के
१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ५४.०० टक्के










Leave a Reply