Good news : कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लस 73 दिवसांनी बाजारात येणार!

Good news : कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लस 73 दिवसांनी बाजारात येणार!
Pckhabar- कोरोना लसीबाबतची भारताची प्रतीक्षा लवकरच आशा आहे. आगामी 73 दिवसांमध्ये ‘कोविशिल्ड’ नावाची कोरोनावरील भारताची पहिली लस बाजारात येणार आहे. या लसीवर काम करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने याबाबतची माहिती दिली आहे. लस उपलब्ध झाल्यावर केंद्र सरकारकडून जनतेला मोफत लस देण्यात येणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.
ही लस सिरम इन्स्टिट्यूटच्या मालकीची असून कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अॅस्ट्रा झेनिका लॅबशी याबाबत सर्वात आधी करार केला आहे. या करारांतर्गत भारतीयांसाठी या लसीचे हक्क आणि रॉयल्टी घेण्यात येणार आहे. भारतासह जगातील 92 देशांमध्ये या लसीची विक्री केली जाणार आहे. केंद्राकडून ही लस जनतेला देण्यात येणार आहे. सरकारने यापूर्वी सिरमकडे पुढील वर्षी जूनपर्यंत 130 कोटी नागरिकांसाठी 68 कोटी डोसची मागणी केली आहे.
सरकारने ‘सिरम’ला लस निमिर्तीसाठी विशेष उत्पादन प्राधान्य परवाना दिला आहे. तसेच चाचण्यांची प्रक्रिया 58 दिवसांत पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यामुळे शनिवारच्या या टप्प्यानंतर दुसरा डोस 29 दिवसांनी तयार होईल. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांत अंतिम चाचणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर ‘कोविशिल्ड’ लस बाजारात आणणार असल्याचे सिरमकडून सांगण्यात आले. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला शनिवारपासून सुरुवात झाली. या टप्प्यात 1600 लोकांवर याची चाचणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *