अष्टविनायक गणपतींचा इतिहास आणि माहिती; दुसरा गणपती
Pckhabar- पीसी खबरच्या वाचकांसाठी अष्टविनायक गणपती, पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ गणपती, लाल बागचा राजा या महत्वाच्या गणपतींची माहिती आपणापर्यंत पोहचविण्याच्या मालिकेतील आजचा दुसरा गणपती.
सिद्धिविनायक मंदिर सिद्धेश्वर
हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून 48 किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.
श्री सिद्धेश्वर, सिद्धिविनायक मंदिर आणि परिसर
सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे 5 किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.










Leave a Reply