पिंपरी महापालिका आयुक्तांच्या घरचे बाप्पा
Pckhabar: लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील ‘आविष्कार’ बंगल्यावर देखील बाप्पा आले आहेत.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील बंगल्यावर उत्साहात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आयुक्तांचा घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. त्यांच्या घरी पाच दिवसांचे बाप्पा येतात. सन 1991 पासून गणपतीचे विर्सजन करण्याचे बंद केले आहे. देव्हा-यातीलच मूर्ती प्रतिष्ठापीत केली जाते. घरामध्येच पाण्यात विसर्जित केले जाते आणि पुन्हा ती मूर्ती देव्हा-यात ठेवली जाते.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन त्यांनी पिंपरी -चिंचवडकरांना केले आहे.










Leave a Reply