चिंचवडमधील शरद गमे आणि परिवाराचे पर्यावरण पूरक बाप्पा !
Pckhabar- चिंचवड, स्वप्नशिल्प हौसिंग सोसायटी येथील रहिवासी शरद गमे यांच्या घरी शाडू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
याबाबत शरद गमे म्हणाले, आमचा दरवर्षी पाच दिवसांचा गणपती असतो, आम्ही शाडु मूर्तीची दरवर्षी घेतो, आरास ही पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करून करतो,
गणपतीचे आगमन झाले की घरात खूपच चैतन्य असते. यावर्षी कोरोनामुळे आरती ला ज्यास्त लोकांना बोलावणार नाही. तसेच विसर्जन ही या वर्षीपासून घरीच करणार आहे. आपल्या पासूनच नदीच्या पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी सुरुवात करून इतरांनाही प्रवृत्त करणार आहे. कोरोनवर लस आल्यानंतर कोरोना कमी होईल. परंतु प्रदूषणावर आपली जागरूकता हीच एकमेव लस असल्याचे गमे म्हणाले.
चिंचवडमधील शरद गमे आणि परिवाराचे पर्यावरण पूरक बाप्पा !







Leave a Reply